सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना 


 2023 वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना सरकार ने दिली एक आनंदाची शिदोरी, (Sukanya Samriddhi Yojana) सुकन्या समृद्धी योजना या केन्द्र सरकारच्या योजनेच्या व्याज दरात वाढ करत सरकारने लोकांचा आनंद द्विगुणित केला आहे. ह्या योजनेच्या चौथ्या तिमाहीचा व्याज दर सरकारने 8.2% केला आहे. ह्या पूर्वी ह्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यासाठी व्याज दर 8% होता. सरकारने फक्त ह्या एकमेव योजनेच्या व्याज दरात वाढ केली आहे आणि आपल्या मुलींच्या जीवनात हास्य फुलवले आहे. 


सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांचे व्याजदर जाहीर केले आहेत. सुकन्या समृद्धी योजना वगळता कोणत्याही जनेच्या व्याजदरात वाढ करण्यात आलेली नाही. जानेवारी ते मार्च या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2  टक्के करण्यात आला आहे. ह्यामुळे सरकारच्या "बेटी बचाओ बेटी पढाओ" के नवी ऊर्जा मिळणार आहे.


दुसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली गेली आहे.

या आर्थिक वर्षात सरकारने या योजनेसाठी व्याजदरात वाढ करण्याची ही दुसरी वेळ आहे.

यापूर्वी पहिल्या तिमाहीत सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8  टक्के केला होता.

अशाप्रकारे पाहिले तर चालू आर्थिक वर्षात सरकारने मुलींसाठीच्या या योजनेच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांनी वाढ केली आहे.


मुदत ठेव(Fixed Deposit ) योजनेच्या व्याजदरातही वाढ केली आहे.

सुकन्या समृद्धी योजनेसोबतच 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील सध्याचा व्याजदर सात टक्क्यांवरून 7.1 टक्के होईल. दुसरीकडे, पीपीएफ आणि बचत ठेवींवरील व्याजदर अनुक्रमे 7.1 टक्के आणि 4 टक्के कायम ठेवण्यात आले आहेत.


किसान विकास पत्रावरील व्याज दर 7.5 टक्के आहे आणि त्याची परिपक्वता कालावधी 115 महिने आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वरील व्याजदर 1 जानेवारी ते 31 मार्च 2024  या कालावधीसाठी 7.7 टक्के इतकाच आहे. मासिक उत्पन्न योजनेसाठी (MIS) व्याजदरात (7.4 टक्के) कोणतीही वाढ झालेली नाही.

भारतात आपल्या समाजासमोर लिंगगुणोत्तर समानता हा एक खुप काळजीचा विषय आहे. म्हणूनच महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि इतर सुविधांसाठी सरकारद्वारे अनेक योजना राबविल्या जात असतात. त्यातीलच एक "सुकन्या समृद्धी योजना" होय. ह्या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचे शिक्षण आणि त्यांचे लग्न सोईस्कर रित्या पार पडले पाहिजे.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना ?

भारतात आपल्या समाजासमोर लिंगगुणोत्तर समानता हा एक खुप काळजीचा विषय आहे. म्हणूनच महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि इतर सुविधांसाठी सरकारद्वारे अनेक योजना राबविल्या जात असतात. त्यातीलच एक "सुकन्या समृद्धी योजना" होय. ह्या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचे शिक्षण आणि त्यांचे लग्न सोईस्कर रित्या पार पडले पाहिजे.

Eligibility of Scheme: योजनेची पात्रता 

  • सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात मुलीच्या नावावर एका वर्षात 1 हजार ते 1 लाख पन्नास हजार रुपये जमा करू शकता.
  • हे पैसे अकाउंट खोल्याच्या 14 वर्षांपर्यंत जम करावे लागतील आणि हे खाते मुलगी 21 वर्षांची झाल्यावर प्रौढ होईल.
  •  नियमांप्रमाणे मुलगी 18 वर्षांची झाल्यावर अर्धा पैसा काढता येईल.
  •  21 वर्षांनातर खाता बंद होऊन पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातील.
  •  जर मुलीचे 18 ते 21 वर्षाच्या आत लग्न झाले तर खात बंद होईल.
  •  उशिरा पेमेंट केल्यास 50 रुपये पेनल्टी लावण्यात येईल.
  •  पोस्ट ऑफिसव्यतिरिक्त काही शासकीय आणि निजी बँक पण या योजनेत खाते उघडत आहे.
  •  या खात्यांवर आयकर कायदा धारा 80-जी अंतर्गत सूट देण्यात येईल.
  •  पालक आपल्या दोन मुलींसाठी दोन खाते उघडू शकतात.
  •  जुळे झाल्यास प्रूफ देऊन तिसरा खातेही उघडवू शकतात.
  •  मुलीचा मृत्यू अथवा 18 वर्षाच्या आत विवाह झाल्यास सदर रक्कम पालकास न देता शासनाच्या खात्यात जमा केली जाईल.
  •  अकाउंट ट्रांसफर केले जाऊ शकते.


Required Documents: योजनेसाठी आवश्यक दस्तऐवज:

  •  जन्म नोंदणी प्रमाणपत्र
  • पत्याचा तपशील 
  •  ओळख प्रमाणपत्र 
सुकन्या समृद्धी योजनेचे फॉर्म ऑनलाईन उपलब्ध आहेत.

हा लेखपण वाचा: Honda Shine च्या कडक लुक ने लोक झाले घायाळ, कमालीच्या मायलेज सोबत दिली धडाकेदार ऑफर.

हा लेखपण वाचा: हिवाळ्यात ही 7 फळे खा: आपले वजन कमी करा आणि पचन सुधारा 

हा लेखपण वाचा: Maruti Swift : New Year Offer मारुती स्विफ्ट च्या चाहत्यांची चांदी. कंपनीकडून धमाकेदार ऑफर, फक्त एवढ्या किमतीमद्धे मिळणार मारुती स्विफ्ट, सूट सूट सूट.....